एल. आर. टी. कॉलेजच्या एनसीसी युनिटद्वारे क्रांती दिनानिमित्त रॅली

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 9 August 2019
  • कॅडेट्सला क्रांती दिनाचे महत्त्व सांगून देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेल्या आपल्या त्यागाची कल्पना विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली.

अकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित व NAAC कडून "अ" दर्जा प्राप्त असलेल्या श्रीमती एल.आर.टी. कॉलेजच्या एनसीसी युनिटद्वारे क्रांती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके सर यांच्या मार्गदर्शनाने रॅलीचे आयोजन केले.

या रॅलीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने, प्राध्यापक डॉ. जे. एम. काळे, डॉ. व्ही. एस. सुखदेवे, डॉ. टी. जी. मिरगे, डॉ. जे. एच. लाहोटी, डॉ. व्ही. के. मिश्रा, डॉ. एच. बी. बडवाईक, डॉ. एन. एम. गुट्टे व एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर उपस्थित होते. 

प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने व एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दिली. डॉ. जी. जी. गोंडाणे यांनी कॅडेट्सला क्रांती दिनाचे महत्त्व सांगून देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेल्या आपल्या त्यागाची कल्पना विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली. एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर यांनी एनसीसी द्वारे आपल्या देशाचा विकास शांती समृद्धी व अखंडता कशाप्रकारे टिकविता येईल याबद्दल माहिती दिली. 

तसेच महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात 09 ऑगस्ट 1942 रोजी तेव्हाचे गोवालिया मैदान आताचे आझाद मैदानावर कशी झाली आणि सर्व भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकतेची भावना कशी निर्माण झाली याविषयी मार्गदर्शन केले.

क्रांती दिन रॅलीची सुरुवात महाविद्यालयातून होऊन रतानलाल प्लॉट, दुर्गा चौक मार्गे जठारपेठ राम नगर, सिव्हिल लाईन चौक मार्गे महाविद्यालयत समाप्त झाली. या रॅली दरम्यान कॅडेट्सनी हम सब एक है। हम सब भारतीय है। भारत माता की जय अशा घोषणा देऊन आपल्यातील देशप्रेम जागृत करून उत्तेजित वातावरण निर्मिती केली. 

रॅली काढण्यामागचे औचित्य म्हणजे एनसीसी कॅडेट्समध्ये देश प्रेम राष्ट्रीय एकतेची नवनिर्मिती करून देश स्वातंत्र्य करण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याला स्मरण करून त्याला उजाळा देणे हा होय.

क्रांती दिन रॅली काढण्यासाठी सिनिअर अंडर ऑफिसर दुर्गेश शुक्ला, जूनियर अंडर ऑफिसर धिरज कातखेडे व स्नेहा खंडारे, सार्जंट यश सूर्यवंशी व अंकिता कोटरवार, कार्पोरल वैशाली महाडिक, पूजा काटे, निकिता पिपरे, प्रतिक साबळे व ऋतिक वानखडे तसेच कॅडेट्स राज महल्ले, अभिषेक धारपवार, अंकुश बोबडे, ज्ञानेश्वर पागृत, गणेश ढगे, शिवा मंडोकार, साहिल शिरसाट, निखिल गवई, सम्यक तेलगोटे, शाम डेहनकर, पंकज बरगड, ज्ञानेश्वर नांदुरकर, जागृती भातुलकर, साक्षी भातुलकर, प्रतिक्षा वानखडे, वैष्णवी लोखंडे, सुष्मिता खरात व वैष्णवी बासंबे यांनी अथक परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News