कुरुक्षेत्र

सुनिल पवार
Friday, 7 June 2019

गलितगात्र झाली जरी आयुधे
तरी गीतेस ठेविलेय स्मरणात
स्फुलिंग भरून मनात
करून शंखनाद पुनश्च मी सज्ज
श्रीकृष्णास घेवून पाठीवर
 समरांगणी लढण्यासाठी..!!

जोखतोय नात्यांचे कांगोरे
पिटतो आहे आशंकांचे धिंडोरे
नरो वा कुंजरोवा जपत
धर्मास घेऊन पाठीवर
कुरुक्षेत्री रण जिंकण्यासाठी..!!

ही कोणती अघोरी तपस्या
जी शोधतेय तिमिरात भक्ष
वेधू पाहतेय आंधळे लक्ष
भळभळत्या जखमेस पूसत
अश्वत्स्थामास घेवून पाठीवर
अंधार लपेटुन घेण्यासाठी..!!

गलितगात्र झाली जरी आयुधे
तरी गीतेस ठेविलेय स्मरणात
स्फुलिंग भरून मनात
करून शंखनाद पुनश्च मी सज्ज
श्रीकृष्णास घेवून पाठीवर
 समरांगणी लढण्यासाठी..!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News