‘मेळघाट मित्र’ रोखणार कोवळी पानगळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी ''मैत्री-मेळघाट मित्र'' गटाच्या वतीने आयोजित धडकमोहिमेला २० जुलै पासून सुरुवात होणार आहे.
  • यावर्षी २० जुलैपासून धडक मोहिमेला सुरुवात होणार असून २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. त्यासाठी दहा दहा स्वयंसेवकांच्या एकूण दहा मोहिमा आखण्यात आल्या आहेत.

 

अकोला -  मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी ''मैत्री-मेळघाट मित्र'' गटाच्या वतीने आयोजित धडकमोहिमेला २० जुलै पासून सुरुवात होणार आहे. राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी, स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होणार असून २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालविली जाणार आहे. ज्यामाध्यमातून बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कुपोषण आणि बालमृत्यूमुळे मेळघाटचा परिसर ‘कुप्रसिद्ध’ आहे. कुपोषणामुळे दरवर्षी शेकडो बालकांचा इथे मृत्यू होतो.

अनेक कारणं. नैसर्गिक परिस्थिती, अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, बेरोजगारी. ही मुलं वाचवीत, कुपोषण थांबावं यासाठी काय करता येईल? वेगवेगळ्या क्षेत्रांतील काही तरुणांनी काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती पाहिली आणि त्यांनी ठरवलं, इथले प्रश्न इथे राहूनच सुटू शकतात, कमी होऊ शकतात. त्यातूनच १९९७ मध्ये ‘मैत्री’ची (‘मेळघाट मित्र’) स्थापना झाली आणि तेव्हापासून ‘मैत्री’च्या वतीनं मेळघाटात दरवर्षी ‘धडक मोहीम’ही राबवली जाते.

महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून तरुण येथे येतात, दहा दिवस राहतात, त्यांच्यात राहून, त्यांच्यासाठी काम करतात आणि परत जातात. गेल्या २१ वर्षांपासून सलग हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी २० जुलैपासून धडक मोहिमेला सुरुवात होणार असून २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. त्यासाठी दहा दहा स्वयंसेवकांच्या एकूण दहा मोहिमा आखण्यात आल्या आहेत.

 
मेळघाट मित्रांचे कार्य
एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे.
गरोदर स्त्रियांना दररोज भेटणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे. गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबवणे. 
साध्या आजारांवर उपचार करणे.
प्थमोपचार पद्धती राबवणे. 
शासकीय आरोग्य विभाग आणि आदिवासी यांच्यात दुवा साधणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News