Kolhapur Flood | बोटींची संख्या वाढवणार; गरज भासल्यास एअर लिफ्टिंग करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांत भीषण परिस्थितीही सांगलीची असून तिथे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करु,

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांत भीषण परिस्थितीही सांगलीची असून तिथे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करु, नागरिकांना पाण्यातून बाहरे काढण्यासाठी पुऱेशा बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. बोटींची संख्या वाढवण्यात येत आहे. जेव्हा कोणताच पर्याय उरत नाही, तेव्हा एअर लिफ्टिंगचा वापर करण्यात येईल असे ते म्हणाले. 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे: 
ओडिशा, पंजाब, गोवा, गुजरातमधील पथके मदतीसाठी बोलावली आहेत, हवामान खराब असल्याने आणि हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय नसल्याने आम्हाला सांगली आणि कराडला जाण्याची परवानगी नाकारली, सांगलीतील स्थिती सर्वाधिक भीषण, आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे गंभीर परिस्थिती, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आलमट्टी धरणातून ५ लाख क्यसेक पाणी सोडणार असल्याचे सांगितले, आलमट्टीमधून पाणी सोडल्यास सांगलीतील पाणी आजच मोठ्याप्रमाणात कमी होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News