पूरस्थिती निर्माण झाल्याने 'या' जिल्ह्यांत आज-उद्या शाळांना सुट्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोल्हापुरात दोन दिवस शाळांना सुट्टी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पूरस्थिती असून आता परिस्थितीने अधिक गंभीर स्वरूप प्राप्त केलं आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा ५ ऑगस्टपासूनच बंद आहेत. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सांगली, पुण्यातही शाळा बंद
कोल्हापूर प्रमाणेच सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्हातील पाच तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यातील तीन तालुक्यांमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News