राष्ट्रपती राजवट लागू होणारे कलम ३५६ नेमकं काय आहे, जाणून घ्या..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019
  • भारतीय राज्यघटनेनुसार कलम ३५२ ते ३६० हे कलम आणीबाणीशी संबंधित आहे.

मुंबई : सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार महाराष्ट्रात  राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आली आहे. 

भारतीय राज्यघटनेनुसार कलम ३५२ ते ३६० हे कलम आणीबाणीशी संबंधित आहे. या कलमांनुसार राज्यघटनेत तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. १) राष्ट्रीय आणीबाणी २) आर्थिक आणीबाणी ३) प्रादेशिक आणीबाणी. यामध्ये राष्ट्रपती राजवटीचा समावेश होतो. 

  • राज्यघटनेचे कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख 
  • कलम ३५६ नुसार, राज्याचे प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावण्यात येते. 
  • ज्यावेळी राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असेल त्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. 
  • राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कुठलाही निर्णय राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने घेत नाहीत. 
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेता येतो.
  • राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारची सर्व सत्ता (उच्च न्यायालयाचे कार्य सोडून) राष्ट्रपतींच्या हाती जाते. 
  • राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने हे कार्य पार पाडतात.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यविधिमंडळाची कार्ये संसदेकडे सोपली जातात. राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांना करावाई करण्यास सांगू शकतात.
  • राज्यातील सर्व सत्तासुत्रे राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या हाती असली तरी राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये उच्च न्यायालयाची सत्ता ते स्वतःकडे अगर दुसऱ्याकडे देऊ शकत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News