के .एल. ई. महाविद्यालयमध्ये पार पडले रक्तदान शिबीर...

दिव्या चौधरी, यिनबझ
Friday, 2 August 2019

नवी मुंबई येथील कळंबोली याठिकाणी असलेल्या के. एल. ई. महाविद्यालयामध्ये गुरूवार (दि. 1) रोजी  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कळंबोली -  नवी मुंबई येथील कळंबोली याठिकाणी असलेल्या के. एल. ई. महाविद्यालयामध्ये गुरूवार (दि. 1) रोजी  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु होते, तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवली. 

विद्यार्थ्यांनीसुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान शिबिरामध्ये आपले योगदान दिले. तब्बल १८० हून अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News