किचनच्या 'या' टिप्स वापरा आणि उत्तम गृहिणी बना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

खमण ढोकळा करताना तो मऊ होण्यासाठी साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. त्यानंतर ढोकळा तयार झाला की, ढोकळ्यावर चमचाभर साखरपाणी टाकून ढोकळापात्र बंद करून ठेवावे. हे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो.

इडली-डोशसाठी नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरावे लागतात. यासाठी थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाइस (प्रमाण आवश्यकतेनुसार) घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होती.

मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी, मोड आलेले संबंध मूग वापरल्यास खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकता वाढते.

कडवे(वाल) रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी (फडक्यात न बांधता) एखाद्या कुंडीत पसरावेत त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात.

अळूवड्या करताना अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत. नंतर ती चाळणीत काढून कागदावर पालथी पसरावीत. प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे, यामुळे वडी खाजत नाही.

उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी रताळी किसून वाळवावी व नंतर जेव्हा उपयोग करायचा तेव्हा मिक्सरमधून काढून त्यात दाण्याचा कूट, हिरवी मिरची, मीठ, जिरे वाटून घालून त्याचा गोळा करून त्याचे थालीपीठ करावेत.
तिखट मिठाच्या पुऱ्यांची कणीक टोमॅटोच्या रसात भिजवावी त्याला वेगळीच चव येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News