५० फूट उंच ब्रिजवर चुंबन करताना प्रेमी युगलांचा गेला तोल; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • ५० फूट उंच ब्रिजवर प्रेमीयुगल
  • प्रेम अनावर झाला
  • दोघेही एकमेंकांच्या प्रेमात बुडाले
  • स्पॅनिश: Cuzco

कुस्को : प्रेम हे शाश्वत असते. प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी प्रेम करतोच. पण प्रेम करताना सुरक्षा तेवढीच महत्वाची असते, याचा प्रेमीयुगलांना अनेकदा विसर पडतो. त्यातून कधीकधी प्राणही गमवावे लागतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक प्रेमीयुगल ५० फूट उंचीवर रोमान्स करत होते. त्यावेळी अचानक तोल जाऊन दोघांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

ही दुर्दैवी घटना  पेरूमध्ये देशातील कुस्को शहरात घडली आहे. ५० फूट उंच ब्रिजवर प्रेमीयुगल रोमान्स करत होते आणि त्यांना जगाचा विसर पडला याचे त्यांना भानच राहिले नाही. अचानक तोल जाऊन खाली पडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी घडली आहे. हेक्टर विडल(३६) आणि मेबेथ इस्पिनोझा (३४) असे त्या दुर्दैवी प्रेमीयुगलाचे नाव आहे. रात्री दोघेही बाहेर फिरायला गेले होते त्यावेळी एका ब्रिजवर चुंबन घेत होते. 

ब्रिजच्या ग्रीलवर मेबेथ बसली होती आणि हेक्टर उभा होता. दोघेही एकमेंकांच्या प्रेमात बुडाले होते. त्यावेळीच अचानक मेबेथचा तोल गेला. तिला वाचवण्यासाठी हेक्टर पुढे सरसावला मात्र त्याचाही तोल गेला. दोघेही ५० फूट उंच ब्रिजवरून खाली पडले. उपस्थित लोकांनी सांगितले की, ब्रिजवरून पडल्यानंतर दोघेही जिवंत. त्याना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News