‘किक २’ रोहित शेट्टीकडे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

गेल्या वर्षभरापासून ‘किक २’च्या कथेवर काम सुरू आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सलमान खान एका चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकाच प्रोजेक्‍टवर सध्या आम्ही चर्चा करत आहोत, असेही सलमानने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित ‘किक २’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात सलमान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या वर्षभरापासून ‘किक २’च्या कथेवर काम सुरू आहे. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

‘किक’च्या सीक्‍वेलसाठी रोहित अगदी योग्य असल्याचे साजिद यांचे म्हणणे आहे. आता ‘किक २’ची अधिकृत घोषणा कधी होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News