किआरा अडवाणीचा फिटनेस फंडा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

वर्कआउट करण्याआधी मी सफरचंदाचे काही तुकडे आणि पीनट बटर खाते. दुपारचे जेवण बरोबर १२.३० वाजता करते. यामध्ये डाळ, रोटी आणि भाजी खाते. त्यानंतर भूक लागल्यास मी सुकामेवा खाते.

मला खरी ओळख ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून मी चर्चेचा एक भाग बनले; पण त्या आधीपासूनच मला स्वतःचा फिटनेस राखायची आवड होती. यासाठी मी कडक डाएट व वर्कआउट या गोष्टींचा अवलंब करते; तसेच चमकदार त्वचेसाठीही मी नेहमीच दक्ष असते. यासाठी योग्य उत्पादने वापरणे, वेळेवर त्वचेची काळजी घेणे, भरपूर पाणी पिणे अशा गोष्टी मी करत असते. त्वचा चांगली राहावी यासाठी मी कधीकधी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करते.

मी दिवसाची सुरवात लिंबू पिळलेले कोमट पाणी घेऊन करते. यामुळे वजन कमी होते आणि एनर्जी वाढते. नाश्‍त्यामध्ये मी वाडगाभर ओट्स आणि खूप प्रमाणात फळे खाते. वर्कआउट करण्याआधी मी सफरचंदाचे काही तुकडे आणि पीनट बटर खाते. दुपारचे जेवण बरोबर १२.३० वाजता करते. यामध्ये डाळ, रोटी आणि भाजी खाते. त्यानंतर भूक लागल्यास मी सुकामेवा खाते. रात्रीचे जेवणही मी लवकर घेते. यामध्ये साधारणतः ग्रीन सलाड, मासे असे पदार्थ खाते.

वर्कआउटमध्ये मात्र मला सातत्याने बदल लागतो. मी रोजच जीमला जाते. यामध्ये मी कार्डिओ, फंक्शनल ट्रेनिंग, स्क्वॅट्स करते. हे सगळे मी तासभर करते. मला जीमला जाता येत नाही, त्यावेळी मी नृत्य, किक बॉक्सिंग करते. दिवसातून काहीतरी शारीरिक श्रम केले पाहिजेत, याच्यावर मी विश्‍वास ठेवते. त्यामुळे शक्य त्या गोष्टी मी करत असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News