'खारी बिस्कीट'ने गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

यिनबझ टीम
Thursday, 7 November 2019

'खारी बिस्कीट' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होताच लोकांनी चित्रपटगृहाबाहेर लांबच लांब गर्दी करत सिनेमाला पंसती दर्शवली आहे. हा सिनेमा दोन चिमूरड्या भावा-बहीणीं आधारित आहे. या चिमुरड्यांच्या अभिनयाचं बरंच कौतुक होतानासुद्धा दिसत आहे.

मुंबई- 1 नोव्हेंबरला 'खारी बिस्कीट' हा मराठी चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्या चर्चांना उधान आले. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामुळे सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली होती आणि तसा उत्साहही प्रेषकांमध्ये दिसून येत आहे. 'खारी बिस्कीट' ह्या सिनेमाच्या 'लाडाची गं' आणि 'तुला जपणार आहे' या गाण्यांनी लोकांना वेड लावले आहे, तसेच टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरदेखील ही गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर खारी बिस्कीटच्या गाण्यांना आणि ट्रेलरला तब्बल २.५ कोटी व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

'खारी बिस्कीट' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होताच लोकांनी चित्रपटगृहाबाहेर लांबच लांब गर्दी करत सिनेमाला पंसती दर्शवली आहे. हा सिनेमा दोन चिमूरड्या भावा-बहीणीं आधारित आहे. या चिमुरड्यांच्या अभिनयाचं बरंच कौतुक होतानासुद्धा दिसत आहे.  सिनेमाचा विषय, कथा, त्याची मांडणी, त्यातील सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, संवाद, संगीत आणि कॅमेरातून टिपलेली 'मुंबई' तरुणाईला आकर्षित करत आहे आणि म्हणूनच तरुण वर्ग सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता पहिल्या दोनच दिवसात सिनेमाच्या शोची मागणी कमालीची वाढली आहे.

'खारी बिस्कीट' ह्या सिनेमामधील दोन चिमुरडे कलाकार म्हणजेच आदर्श आणि वेदश्री या दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडली आहे.  या गोंडस जोडीने प्रेक्षकांच्या मनात अवघ्या काही दिवसातंच घर केलं आहे.  या चिमुरड्यांच्या अभिनयाचे बरच कौतुक होताना दिसत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गाजत हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. या सगळ्याचा खूप चांगला परिणाम सिनेमासाठी झाला आणि ओपनिंगलाच तीनशेहून जास्त चित्रपटगृहाची मागणी झाली होती. प्रेक्षकांनी प्रतिसाद देताना असे सांगितले की जर हा सिनेमा पाहिला नसेल तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन  नक्की पहावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News