खर्डी जीवनदीप महाविद्यालय 'मतदार जनजागृती अभियान' संपन्न

दिव्येश जाधव, खर्डी
Wednesday, 16 October 2019

जीवनदीप महाविद्यालयातील कनिष्ठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात रॅलीचे आयोजन केले होते.

खर्डी - जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज खर्डी स्टेशन ते खर्डी बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने जीवनदीप महाविद्यालयातील कनिष्ठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात रॅलीचे आयोजन केले होते. 

या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरीकांना आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. विविध प्रकारच्या घोषणा व स्लोगन याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मा. के. आर. कळकटे सर यांनी या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष मा. रविंद्र घोडविंदे सर यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 160 पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी प्राध्यापक देखील सहभागी होते. यामध्ये प्रा. अपर्णा जाधव, प्रा. दीप्ती बांगर, प्रा. डी. वाय. विशे, प्रा. एन. एम. घोरपडे, प्रा. आर. बी धसाडे, प्रा. एस. व्ही. देशमुख हे सहभागी होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News