ग्रीन थिएटर फेस्टिवलमध्ये खोपा ठरली सर्वोत्कृष्ट 

अतुल पाटील, औरंगाबाद
Tuesday, 12 February 2019

औरंगाबाद : पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेल्या "ग्रीन थिएटर फेस्टिवल'मध्ये औरंगाबादच्या खोपा एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, गरवारे कम्युनिटी सेंटरचे गरवारे बाल भवन यांच्यातर्फे मराठवाडा पातळीवर ही स्पर्धा घेण्यात आली. 

औरंगाबाद : पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेल्या "ग्रीन थिएटर फेस्टिवल'मध्ये औरंगाबादच्या खोपा एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, गरवारे कम्युनिटी सेंटरचे गरवारे बाल भवन यांच्यातर्फे मराठवाडा पातळीवर ही स्पर्धा घेण्यात आली. 

प्राथमिक फेरीतून नऊ संघांची निवड केली होती. विद्यापीठाच्या नाट्यगृहात विजेत्यांना बक्षीस दिले. कुलसचिव डॉ. साधना पांडे, सीजीएसटी अधिकारी जयश्री गवई, डॉ. दिलीप यार्दी, डॉ. जयंत शेवतेकर, गरवारे समूहाचे डॉ. जीवन चौधरी, सुनील सुतावणे, इको फोक्‍सचे परेश पिंपळे यांची उपस्थिती होती. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या लोककला विभागाचे शाहीर अजिंक्‍य लिंगायत यांच्या संचने लोककलेतून पर्यावरण जनजागृती लोककला प्रकार सादर केला. 

निकाल पुढील प्रमाणे (अनुक्रमे - प्रथम, द्वितीय, तृतीय) : 

एकांकिका : "खोपा' - अनंत भालेराव विद्यामंदिर, औरंगाबाद. "बाजीराव मस्तानीची काशी' - श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल, लातूर. "थेंब जपू पाण्याचा' - शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद. 

उत्तेजनार्थ : "कचरा एक स्त्रोत' - स्व. विलासराव देशमुख फाउंडेशन गोल्ड क्रीस्टहाय इंग्लिश स्कूल, लातूर. "उशिरा सुचलेलं.. शहाणपण' - पायोनिर्स सेकंडरी स्कूल, औरंगाबाद. 

दिग्दर्शक : संतोष गायकवाड (खोपा), मकरंद पत्की (बाजीराव मस्तानीची काशी), वैशाली देशपांडे (थेंब जपू पाण्याचा). 

लेखक : संतोष गायकवाड (खोपा), व्ही. एस. बोंडे (पर्यावरण नाटिका), त्रंबक वडसकर (स्वच्छ भारत). 

अभिनेता : कृष्ण ठोंबरे (बाजीराव मस्तानीची काशी), आयुष सुलाखे (वासुदेव), गणेश जाधव (राजा). 

अभिनेत्री : स्नेहा भालेराव (शेतकऱ्याची बायको), श्रद्धा गोरे (पोखराज), तेजस्विनी सावंत (आईची भूमिका). 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News