सुवर्ण मंदिरात खलिस्तान जिंदाबाद ; शीख युवक आणि एसपीजी टास्क फोर्स यांच्यात संघर्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • शीख युवक आणि एसपीजी टास्क फोर्स यांच्यात संघर्ष
  • कट्टर शीखपंथीय गट दल खालसाच्या वतीने बंदचे आवाहन ​

अमृतसर - ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या कारवाईला ३५ वर्षे पूर्ण झाल्याने आज सुवर्ण मंदिरात काही शीख युवकांनी जरनैलसिंग भिंद्रनवाले टी-शर्टचा पेहराव घालून खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या वेळी शीख युवक आणि एसपीजी टास्क फोर्स यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.

आज शहरातील काही भागात बंदसदृश स्थिती होती. कट्टर शीखपंथीय गट दल खालसाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’दरम्यान मारल्या गेलेल्यांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते.

अकाल तख्त आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीच्या वतीने सुवर्ण मंदिरात आयोजित कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांनी हातात तलवारी घेऊन घोषणाबाजी केली. या वेळी तणाव निर्माण झाला होता.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News