#Keyboard माझा आणि Whatsapp Wallपण माझीच

रोहन साळुंखे, किवळ
Sunday, 30 June 2019

भेटायला जमले नाही तरी चालेल प्रेम वाटायला विसरु नका ( मनातून शिव्या घातल्या तरी चालेल, स्वागत आहे) आणि गोड बोलायला...! 

माणसं निरखुन पारखुन मैत्री करणं मला कधीच जमलं नाही ...!
माणसं भेटत गेली, मी जोडत गेलो..!
मला माझ्या मताची फक्त पाच माणसं हवी होती; पण खुप कमी वेळात तुमच्या सारखी असंख्य माणसे मिळाली .
कारण शेवटी गरज पाचच माणसांची आहे,
4 खांदे द्यायला आणि एक मडके धरायला!

असो...
अजूनही तुमच्यासारखी बरीच माणसं भेटतायत...
मित्र बनविण्याचा माझा कारखाना अजुनही चालुच आहे...!
कुणालाही कमी लेखणे, हा माझा हेतु कधीच नव्हता आणि आजही नाही. मी माझे विचार फक्त मांडतोय ते लादत नाही. ज्यांना पटतील त्यांनी स्वीकारावे!
कारण विद्रोही विचार मांडण्याची आज आयतीच संधी चालून आलीय, ती कशी सोडू?
आता Keyboard पण माझा आहे आणि Whatsapp Wall पण माझीच, वाटेल तसं लिखाण करणार, फक्त या समाजाच्या भल्यासाठी!
ज्यांना विचार नाही पटले, त्यांनी सरळ त्याचे खंडन करावे ही विनंती आणि मला ज्यांचे विचार पटत नाहीत, त्यांचे मी खंडन करतोच, क्षमा असावी!
कारण बऱ्याच मित्रांना विचारांची गरज आहे असे वाटते!
तेव्हा थोडासा विचार करुन समजून घ्यावे.
माझी गुतंवणुक ती काय हो?
फक्त चार प्रेमाचे शब्द..( सत्य पण कडू )
आणि उत्पादन विचाराल तर अगणित असामान्य आणि अनमोल मित्र, अगदी तुमच्या सारखे....!
भेटायला जमले नाही तरी चालेल प्रेम वाटायला विसरु नका ( मनातून शिव्या घातल्या तरी चालेल, स्वागत आहे) आणि गोड बोलायला...! 

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News