केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला औरंगाबादेतून अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं. दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला होता.त्यामुळे काहींनी चिडून मराठीचा अट्टाहास करत केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट केली होती. अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. सतीश पाटील असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं. दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश पाटील या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच येत्या काही दिवसात कमेंट करणाऱ्या लोकांना अटक करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मंगळवारी (18 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News