केतकी भगत, संचिता सोनवणे, अनिश रावते, अंश बांगड विजेते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

औरंगाबाद - औरंगाबाद चेस अकादमीतर्फे नऊ वर्षांखालील व महिला गट जिल्हा बुद्धिबळ संघ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या ९ वर्षे गटात केतकी भगत, संचिता सोनवणे आणि मुलांमध्ये अनिश रावते, अंश बांगड यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत आपापल्या गटात बाजी मारली. 

औरंगाबाद - औरंगाबाद चेस अकादमीतर्फे नऊ वर्षांखालील व महिला गट जिल्हा बुद्धिबळ संघ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या ९ वर्षे गटात केतकी भगत, संचिता सोनवणे आणि मुलांमध्ये अनिश रावते, अंश बांगड यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत आपापल्या गटात बाजी मारली. 
कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या स्पर्धेत २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणत्र देण्यात आले. या स्पर्धेतून खेळाडूंची निवड औरंगाबादच्या संघात करण्यात येईल. हा औरंगाबादचा संघ २८ ते ३० जूनदरम्यान मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्‍यपद स्पर्धेत सहभागी होईल. 

अंतिम निकाल -  ९ वर्षे ः अनिश रावते (५ गुण), अंश बांगड (५ गुण), आर्यन सोनवणे (५ गुण), अर्णव तोतला (४.५ गुण), रायन लोहाडे (४ गुण), संकपाळे सोनवणे (४ गुण), युवराज जाधव (४ गुण), कौस्तुभ वाघ (४ गुण), श्रेयस तायल (४ गुण). मुली ः केतकी भगत (४ गुण), संचिता सोनवणे (३ गुण), पलक सोनी (३ गुण), शर्वनी नानकर (३ गुण), रेणुका जी. (२ गुण), श्रेया पराडकर (२ गुण), वंशिका तिवारी (२ गुण). 
शहरात मोफत योग शिबिराला प्रारंभ

औरंगाबाद -  भारतमाता क्रीडा मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पतंजली योग समितीतर्फे आयोजित तीनदिवसीय योगासन प्रशिक्षणाला बुधवारी (ता. १९) सुरवात झाली. हे मोफत योग प्राणायम शिबिर १९ ते २१ जूनदरम्यान सकाळी ५.३० ते ७ दरम्यान भारतमाता क्रीडांगण, ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे घेण्यात येणार आहे. 
या शिबिरात योग शिक्षक व मार्गदर्शक महेश पूर्णपात्रे, माणिक टाकळकर, नागोराव कदम, रामकृष्ण धारासूरकर हे प्रशिक्षण देणार आहेत. हे शिबिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून, त्यात कोणत्याही वयाचे लोक सहभागी होऊ शकतात. सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मारुती फुलारी, सुनील चौधरी, जयेंद्र दळवी, सुनील लोखंडे, वैशाली लोखंडे, ममता पाटील, भगवान वळसे, मोहनराव हिंपळनेकर यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News