शिक्षण घेताना विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवा: कवी सायमन मार्टिन

प्रसाद जोशी
Tuesday, 9 July 2019

वसई: मोबाईल दुधारी शस्त्र आहे. त्याचा अतिवापर नको. यश टिकवून ठेवायचे असेल तर मेहनत व चिकाटी आवश्यक आहे. स्वप्न उराशी बाळगून पुढचा प्रवास करा. विद्यार्थ्यांचं वय साहस दाखविण्याचे असते मात्र ते भलते साहस नको. शिक्षण घेताना विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवा पुस्तकाची संगत धरा असे आवाहन कवी सायमन मार्टिन यांनी विद्यार्थ्यांना केले.

युवा एकता मंचातर्फे विरार येथे 20 शाळांमधील 130 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कवी सायमन मार्टिन, मनोज आचार्य, युवा एकता मंचचे सिद्धार्थ देवरुखकर, सूरज वर्मा, दीपक सरकार, कल्पेश घाटाळ, मंगला परब, मुर्तुजा इलेक्ट्रिकवाला, अक्षय वांगणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जागतिकीकरणामुळे संपूर्ण विश्व आपल्यासाठी खुले आहे. स्पर्धा असली तरी संधी देखील मुबलक आहे. चित्र संगीत साहित्यामध्ये गती असेल तर तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता असे यावेळी चित्रकार मनोज आचार्य यांनी मत मांडले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माने यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News