राग व्यक्त करण्याची ही नवी पद्धत

रमेश सूद
Saturday, 29 June 2019

‘‘सर, मला खूपच लवकर राग येतो. मी शीघ्रकोपी आहे,’’ त्या तरुणाने मला त्याची समस्या सांगितली. त्यावर मी त्याला विचारले, ‘‘म्हणजे तुला उशिरा किंवा सावकाश राग यायला हवा, असेच ना?’’ माझ्या या प्रश्‍नावरती तो गडबडला आणि म्हणाला, ‘‘नाही, तसे नाही. माझी स्वत:ला नियंत्रित करण्याची इच्छा आहे.

‘‘सर, मला खूपच लवकर राग येतो. मी शीघ्रकोपी आहे,’’ त्या तरुणाने मला त्याची समस्या सांगितली. त्यावर मी त्याला विचारले, ‘‘म्हणजे तुला उशिरा किंवा सावकाश राग यायला हवा, असेच ना?’’ माझ्या या प्रश्‍नावरती तो गडबडला आणि म्हणाला, ‘‘नाही, तसे नाही. माझी स्वत:ला नियंत्रित करण्याची इच्छा आहे.

मी रागावू इच्छित नाही.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘आपल्याला अजिबात रागच येऊ नये, ही फारच अवघड गोष्ट आहे.’’ त्याने यावर पुन्हा मला प्रश्‍न केला, ‘का?’ मी उत्तर देत म्हणालो, ‘‘खरंतर, इतरांवर किंवा स्वतःवर रागावणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे घडते. अगदी आताही मी तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर न देता दुसरीकडेच कुठेतरी पाहत बसलो, तुझ्याकडे दुर्लक्ष केले तर तू निराश होशील.’’ तो म्हणाला, ‘‘होय मला निराश वाटेल.’’ मी पुन्हा त्याला म्हणालो, ‘‘अगदी बरोबर. आता तू निराशेच्या अवस्थेतून लगेच परत पूर्वपदावर येत असशील तर ते योग्य असेल.

मात्र, तू माझ्यावर रागावलास, रागावून कोणतीही प्रतिक्रिया दिलीस, तर आपला प्रवास कोणत्या दिशेने होईल, हे तुला कधीच समजणार नाही. ते माझ्यावरसुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे मी तुला असे सुचवीन की, राग येऊ दे आणि त्याला लगेच तसा परतही जाऊ दे. तू रागाला थांबवून ठेवू नकोस.’’ एखादा चोर मध्यरात्री घरात चोरी करण्याच्या उद्देशाने मागील दाराने घुसतो.

मात्र, तो कशाचीही चोरी न करता किंवा कुणालाही जखमी न करता पुढील दाराने बाहेर पडतो. अगदी याचप्रमाणे रागही आपल्यातून असा नुकसान करता बाहेर पडायला हवा. आपल्याला राग येतो, याची आपल्या काळजी वाटायला नको, तर तो अनावश्‍यकरीत्या रेंगाळू नये, याची आपण काळजी करायला हवी. या अनाहूत पाहुण्याला वेळेवर निघून जाऊ द्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News