फ्रिजमध्ये भाज्या- पदार्थ ठेवताना 'ही' खबरदारी घेणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

सध्याच्या गरम वातावरणात भाज्या, फळं आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. हे पदार्थ जास्त काळ टिकावे यासाठी आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. अनेकदा  फ्रिजमध्ये  ठेवल्यानंतरही फळं, भाज्या लवकर खराब होतात. अशावेळी पदार्थ साठवताना  काही खबरदारी घेणे गरजेचे असते. 

भाज्या फळ साठवताना
- भाज्या, फळं साठवताना ते आधी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाण्यात धुवून फळं आणि भाज्या पूर्णपणे कोरड्या करून घ्या. नंतर त्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून साठवून ठेवा. न्यूजपेपरमध्ये फळं किंवा भाज्या गुंडाळून ठेवणं टाळा. 
- त्याचप्रमाणे भाज्या,  फळं साठवण्यासाठी येणाऱ्या विशिष्ट बॅगचाही वापर तुम्ही करू शकता. या बॅगमध्ये हवा खेळती राहण्यासाठी छिद्रं असतात, त्यामुळे फ्रिजमध्ये फळं, भाज्या अधिक काळ ताज्या राहतात. 

- केळी कधीही  फ्रिजमध्ये ठेवू नका. 
- चिझ, बटर,  पनीरसारखे पदार्थ फ्रिजच्या दरवाज्याकडील भागात ठेवणं टाळा.
- मासे, मांस साठवून ठेवत असला तर ते मॅरिनेट करून फ्रिजमध्ये साठवून ठेवा.
- फ्रिजमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक काळ फळं, भाज्या आणि पदार्थ ठेवू नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News