शिक्षक भरतीच्या जाहिरातीत ‘एसईबीसी’च्या जागा कायम ठेवा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

औरंगाबाद: मराठा आरक्षण दुरुस्ती कायदा लागू होण्याआधी प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरती पदांच्या जाहिरातींमधील एसईबीसी प्रवर्गाच्या जागा कायम ठेवण्यात याव्यात, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट्‌स असोसिएशनतर्फे करण्यात आली. याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंके यांना निवेदन देण्यात आले.

औरंगाबाद: मराठा आरक्षण दुरुस्ती कायदा लागू होण्याआधी प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरती पदांच्या जाहिरातींमधील एसईबीसी प्रवर्गाच्या जागा कायम ठेवण्यात याव्यात, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट्‌स असोसिएशनतर्फे करण्यात आली. याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंके यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा लागू झाल्यानंतर लोकसेवा व सरळसेवांमध्ये १६ टक्‍क्‍यांप्रमाणे जागा राखीव ठेवल्या होत्या. त्या आधारावर आतापर्यंत शिक्षक भरती, मेगा भरती व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी शिक्षक भरतीत जिल्हा परिषदेच्या ३४ जागांपैकी २२ हून अधिक जागा व इतर अनेक मनपा आणि नगरपरिषदेमध्ये एसईबीसी प्रवर्गास शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यातही केवळ पाच ते सहा आस्थापनांमध्ये १६ टक्के जागा दिल्या आहेत. 

महाराष्ट्रातील ३२ टक्के समाजातील या शिक्षक भरतीमध्ये अगोदरच सात ते आठ टक्के जागा वाट्याला आल्या आहेत. त्यात मराठा आरक्षण कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार तीन टक्के कपात होणार असेल तर अत्यंत तुटपुंज्या जागा मराठा समाजाला राहतील. त्यामुळे आधीच रखडलेल्या भरतीला आणखी उशीर होईल. या भरतीत अन्याय झाल्यास मराठा तरुणांकडून प्राणांतिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येईल. यावर संतोष मगर, परमेश्‍वर इंगोले, बाळासाहेब भुसारे, गणेश चव्हाण, गणेश शिंदे, काजल नागटिळक, स्वाती भोसले, सुषमा थोरात, अश्‍विनी माने, रूपाली जावळे, राहुल पुंड यांच्यासह २५ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News