परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न तरी करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून (ता. १७) सुरू होत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून सर्व परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान, तर बारावीची परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी, त्यांचे पालक येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी प्रतिबंधात्मक आदेश मंगळवारी जारी केले. 

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रितरीत्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत.

परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्‍स, पानटपरी, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक परीक्षा संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेशासाठी मनाई राहील. हा आदेश सर्व परीक्षा केंद्र परिसरात ३ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News