रचना करूण रसातीली

रोहिणी बेडेकर
Friday, 2 August 2019

काल्पनिक तिसऱ्या युद्धाच्या कल्पनेनं आणि त्याच्या संभाव्य परिणामानी आपण हादरलो, भयानक रस आणि बीभत्स रस त्यात एकवटले. सुभाष काकांनी मला या दोन रसातील फरक विशद करायला सांगितले. भयानक रस म्हणजे माणसाच्या मनातील भीतीचे अविष्कार. युद्धाच्या कल्पनेने आपण भयभीत होतो. त्यातील संहार हा मृत्यू प्राप्त करून देतो.

शेवटी भीती ही मृत्यूचीच असते. युद्धाचा शेवट आणि त्याची दृश्य ही भयंकरी असण्यापेक्षा किळस आणणारी दृश्य दाखवतात. आपल्याला मळमळणे यासारख्या भावना त्या दृश्यामुळे उद्भवतात,म्हणून बीभत्स रस!

आता आपले मन एवढे विषण्ण झाले असता आपण असे होऊ नये म्हणून परमेश्वराची करुणा भाकतो. त्याला आवाहन करतो. त्याला दोषही देतो. दाटून येणे, आणि त्या भावनेतून भक्त परमेश्वराची आळवणी करतो, दुःख, दैन्य यातून करूण रसाची निर्मिती होते.

म्हणून आज सादर केलेली रचना करूण रसातील आहे. आपल्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे. या रचनेला मला शीर्षक देता आले नाही. आपणांपैकी कुणाला सुचले तर अवश्य कॉमेंट मध्ये विशद करावे. कविता मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील संवाद कल्पून लिहिली आहे.

                                            करूण रस:

मनुष्य:
जन्म मृत्यूच्या या अशांत येरझारा
कर्मचक्राचा श्वासावर खडा पहारा॥

एक जीर्ण झाला देह दुसरा धरियेला
एक जीव जन्मला दुसरा मारीयला॥

एकटेच आलो बा एकटेच का जायाचे
कर्मगतीचे त्रास बा आमीच भोगायाचे॥

कुठे बसून राहियेला सोडून आम्हांसी
का बा मूर्तीत गुंतुन ऐसा शांत झालासी॥

परमेश्वर:
कुणास पुससी वत्सा, सांग हे मनुष्या,
मुरत मीये निर्मिली का तूंचि रे मनुष्या॥

प्राणात्म फुंकिले, काया मी च दिधली 
अन तुला तुझी मने अन बुद्धी अर्पिली॥

सर्वश्रेष्ठ रचना असशील ही तू माझी
नासवलीस कर्मयोगे आयुष्ये तू तुझी॥

मनुष्य: 
चुकलो, चक्रावलो, फसलो या चक्रात मी
ओढविली मजवर मी चक्राची संक्रांत मी॥

बा तू होसी पुनश्च गुरू घे शरणागतीस मी
सोडवि आशिर्वचनांनी चरणाशी आलो मी॥

परमेश्वर:
तू वत्स रे मी माय तुझी 
तुजलागी करुणा दाटली
स्वीकारली कर्मे मी तुझी
अन पापेही तुझी आटली॥

आता कर आराधना
आळव मज करुणेने
एकाग्र कर चंचल मना
प्राप्त मी होईन ममतेने॥

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News