‘भूलभुलैया’च्या सिक्वेलमध्ये कार्तिक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

‘भूलभूलैया’च्या चित्रपटात कार्तिक आर्यन अक्षयची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘प्यार का पंचनामा’ हिट ठरल्यानंतर त्याने ‘सोनू की टिटू की स्वीटी’, ‘लुका छुपी’सारखे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट केले.

आता तो लवकरच अजून एका चित्रपटात झळकणार आहे. २००७ मध्ये आलेल्या अभिनेता अक्षयकुमारचा सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूलभूलैया’च्या सिक्वेलसाठी कार्तिकच्या नावाची चर्चा सुरू आहे.

या चित्रपटात तो अक्षयची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची कथा फरहाद सामजी यांनी लिहिली आहे. तसेच चित्रपटाच्या स्टारकास्टवर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News