कर्नाटकात भाजप आता सर्व पक्षांना करणार साफ : आपल्या मार्गाने सत्ता मिळविण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग
  • ‘ऑपरेशन कमळ’ला भाजपश्रेष्ठींचा हिरवा कंदील

बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारचे पतन करण्यासाठी ऑपरेशन कमळ मोहीम हाती घेण्यास भाजप पक्षश्रेष्ठींनी अखेर हिरवा कंदील दाखविला, त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आता जोर येणार असून, कोणत्याही वेळी राजकीय परिवर्तन घडण्याची शक्‍यता आहे.

आघाडी सरकारचे पतन आपसांतील वादातूनच होईल, याची भाजप नेत्यांनी आजवर प्रतीक्षा केली; परंतु त्याला गती येत नसल्याने भाजप श्रेष्ठींनी आता आपल्या मार्गाने सत्ता मिळविण्याचा निर्धार केला आहे. आघाडीच्या दोन्ही पक्षांतील असंतुष्ट आमदार येणार असतील तर त्यांना पक्षात येऊ द्या, पक्षश्रेष्ठींचा त्याला आक्षेप राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

मंत्रिपद व पक्षात योग्य मान न मिळालेले काँग्रेस व जेडीएसमधील २० ते २५ असंतुष्ट आमदार सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. यादरम्यान, जेडीएसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले एच. विश्वनाथ व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार रामलिंगा रेड्डी यांनी एकत्र येऊन चर्चा केल्याचे समजते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News