तब्बल 10 वर्षाने करीना कपुर आणि आमिर खान पुन्हा एकत्र..

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

तिने गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि ओढणी घेतली आहे. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर मेकअपही दिसून येत नाही आहे. या लूकमध्ये बेबो खूपच सिंपल दिसत आहे.

‘जब वी मेट’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम रिटर्न्स’ सारख्या अनेक हिट चित्रपटांत अभिनेत्री करिना कपूरने बॉलीवूडमध्ये आपले अनोखे स्थान मिळवले.  आता लवकरच ती अभिनेता आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याआधी आमिर-करिनाने ‘थ्री इडियट्‌स’ आणि ‘तलाश’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

‘लाल सिंह चड्ढा’ हा त्यांचा तिसरा एकत्र चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील बेबोचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि ओढणी घेतली आहे. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर मेकअपही दिसून येत नाही आहे. या लूकमध्ये बेबो खूपच सिंपल दिसत आहे. या चित्रपटात बेबोची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. ती भूमिका कोणती असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तिच्या या व्हायरल लूकमुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News