मुंबईच्या पावसात अडकली TV अॅक्ट्रेस, वाचवायला गेलेल्या करण पटेलची कार डॅमेज

ऐश्वर्या जाधव (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

देशात भरपूर ठिकाणी पावसाची वाट बघत असताना मुंबईकर मात्र पावसाने बेहाल झाले आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर TV अॅक्ट्रेससुध्दा यापासून बचावले नाहीत.

देशात भरपूर ठिकाणी पावसाची वाट बघत असताना मुंबईकर मात्र पावसाने बेहाल झाले आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर TV अॅक्ट्रेससुध्दा यापासून बचावले नाहीत. दूरदर्शन वाहिनीवरील अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा हिने पावसात अडकल्याची बातमी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली. त्या ठिकाणी तिला वाचवण्यासाठी योग्य वेळी अभिनेता करण पटेलने हजेरी लावली, मात्र मोठ्या पावसामुळे वाचवायला गेलेल्या करणचीच कार डॅमेज झाली.

पावसामुळे आम्ही भरपूर वेळ रस्त्यावर अडकून होतो असे क्रिस्टल डिसुजाने सोशल मीडियाला सांगितले. आम्ही ज्या ठिकाणी अडकलो होतो, त्या ठिकाणापासून करण पटेलचे घर जवळ होते. आम्ही त्यांना फोन केला, थोड्याच वेळात ते आमच्या मदतीसाठी आले, मात्र त्याची गाडीपण थोड्यावेळाने बिघडली.

 

 
क्रिस्टल डिसूजा हिने करण पटेल याच्या घरी पोहोचल्या नंतर बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडीओमध्ये करणने कशाप्रकारे मैत्री निभावत आपला जीव वाचवला, हे सांगत डिसूजाने करणचे आभार मानले. क्रिस्टलच्या चाहत्यांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. करण पटेल हा दूरदर्शन वरील नामांकित अभिनेत्यांमधला एक आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News