कल्याण: तरूणांचा कलावंतीण दुर्ग यशस्वीपणे सर

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

नेहरूंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कल्याणातील गिर्यारोहकांनी विशेष चौमाल (८), अथर्व रहाणे (१३), विश्‍वास पाणकर (१४) यांच्यासह कलावंतीण दुर्ग यशस्वीपणे सर केला.

कल्याण  : १४ नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली म्हणून कल्याणातील युवकांनी कलावंतीण सुळका मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत प्रशिक्षित गिर्यारोहकांसह आठ ते पंधरा या वयोगटातील मुलेदेखील सहभागी झाली होती. 

१४ नोव्हेंबर १९६५ रोजी नेहरू माउंटनियरिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. येथे गिर्यारोहकांना साहसी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. नेहरूंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कल्याणातील गिर्यारोहकांनी विशेष चौमाल (८), अथर्व रहाणे (१३), विश्‍वास पाणकर (१४) यांच्यासह कलावंतीण दुर्ग यशस्वीपणे सर केला. या मोहिमेचे नेतृत्व सूरज सुतार, नीलेश माने आणि वैभव ऐवळे यांनी केले. तसेच या मोहिमेत सुमित नाईक-धुरे, अश्‍विनी चौमाल आणि रोहित हिवाळे सहभागी झाले होते. मात्र बदलत्या काळाची गरज लक्षात घेत मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राच्या या वैभवशाली परंपरेची ओळख करून देणे आवश्‍यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News