कढाई पनीरचा कट असा बनवा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • कढाई पनीर

 

 साहित्य 

  • ३०० ग्रॅम पनीर
  • १ मोठी सिमला मिरची
  • १ मोठा कांदा
  • २ मध्यम टमॅटो
  • १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
  • १ मोठा चमचा धने
  • ३ किंवा ४ लाल मिरच्या (आकाराप्रमाणे)
  • १ चमचा गरम मसाला
  • २ चमचे तेल
  • कसुरी मेथी
  • चवीला मिठ

कृती

  1. पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून घेतले. इथल्या देशी दुकानात मिळाणारं पनीर नीट पॅक केलेलं होतं, त्यामुळे ते पुन्हा धुतलं नाही. हवं असेल तर धुवुन कोरडं करून घेऊ शकता.
  2. सिमला मिरची उभी चिरून घेतली. कांदा आणि टमॅटो बारिक चिरून घेतले.
  3. धने आणि लाल मिरच्या एकत्र करून मिक्सरवर कोरडं दळून घेतलं. ह्याला 'कढाई मसाला' म्हणायचं म्हणे.
  4. कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर कांदा परतून घेतला. (पारदर्शक होईपर्यंत).
  5. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाई पर्यंत परतून घेतलं.
  6. मग टमॅटो घालून दोन मिनिटे परतलं आणि मग त्यावर कोरडा कढाई मसाला घातला.
  7. हे सगळं मिश्रण गोळा होऊन त्यातून तेल सुटेपर्यंत परतलं.
  8. त्यात सिमला मिरची घालून दोन मिनिटे परतलं.
  9. त्यात अंदाजे पाणी घालून सिमला मिरची अर्धवट शिजू दिली.
  10. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून वरून गरम मसाला घातला.
  11. चवीप्रमाणे मिठ घालून नीट ढवळून घेतलं आणि १० मिनीटे शिजू दिलं.
  12. वरून कसुरी मेथी चुरून घालून गॅस बंद केला.
  13. खायला घेताना वरून लिंबू पिळून घेतलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News