के. के. वाघ कॉलेजने आयोजित केला माजी विद्यार्थी मेळावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 November 2019

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने वाघ कॉलेजच्या माजी विद्यार्थांसाठी मेळावा आयोजित करणायात आला आहे. या मेळाव्यात एकून ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

निफाड : कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने वाघ कॉलेजच्या माजी विद्यार्थांसाठी मेळावा आयोजित करणायात आला आहे. या मेळाव्यात एकून ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था २०१९ ते २०२० रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. वर्षभर या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू आहेत. अनेक महाविद्यालयांनी या मेळाव्यात सहभाग घेतला त्यामध्ये के. के. वाघ माध्यमिक विद्यालय, पिंपळस आणि गीताई कन्या विद्यालय, विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज, ही कॉलेजेस होती.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय मोरे, विश्वस्त समीर वाघ, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मुख्याध्यापक शरद गाडे यांच्या हस्ते हॉलच्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन व मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळ व मनोरंजन या सगळ्याचे आयोजन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News