फक्त 'एवढ्या' पैशांसाठी बिचुकले चुकले 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

सातारा - धनादेश न वठल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यामध्ये हजर न राहिल्यामुळे निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अभिजित बिचुकलेला गोरेगाव-मुंबईत टबिग बॉस' मालिकेसाठी तयार केलेल्या घरातूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर आज (शनिवार) न्यायालयात हजर केले. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तीवाद सुरु आहे. 

सातारा - धनादेश न वठल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यामध्ये हजर न राहिल्यामुळे निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अभिजित बिचुकलेला गोरेगाव-मुंबईत टबिग बॉस' मालिकेसाठी तयार केलेल्या घरातूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर आज (शनिवार) न्यायालयात हजर केले. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तीवाद सुरु आहे. 

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणारा अभिजित बिचुकले हा 'बिग बॉस' मालिकेतील सहभागाने राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील त्याच्या करामतीमुळे त्याला या मालिकेतून काढण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. या बिचुकलेला उचलण्यासाठी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाले होते. दुपारी त्यांनी "बिग बॉस'च्या घरातून त्याला ताब्यात घेऊन सायंकाळी साताऱ्यात आणण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. आज (ता. 22) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 

अभिजित बिचुकलेने पैशाच्या चणचणीमुळे 2015 पूर्वी येथील ऍड. संदीप संकपाळ यांच्याकडून हातऊसने 28 हजार रुपये घेतले होते. ते पैसे त्यांनी वारंवार परत मागितले. त्यानंतर बिचुकलेने त्यांना 28 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश संकपाळ यांनी बॅंकत भरला; परंतु तो वठला नाही. त्यामुळे त्यांनी 2015 मध्ये बिचुकलेविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता; परंतु या खटल्यामध्ये बिचुकले हजर राहात नव्हता. तो सतत गैरहजर राहात असल्यामुळे न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच त्याला अजामीनपात्र वॉरंट काढले होते; परंतु दर वेळी तो सापडत नसल्याचा अहवाल पोलिसांकडून जात होता. दरम्यानच्या कालावधीत त्याने अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जही दाखल केले होते.

त्यामुळे खटला दाखल करणारे संकपाळही त्रासले होते. त्यानंतर न्यायालयाने पोलिस अधीक्षकांच्या नावेच बिचुकलेचा अजामीनपात्र वॉरंट बजावला. त्याचबरोबर "बिग बॉस'मध्ये खुलेआम वावरणारा बिचुकले पोलिसांना सापडत कसा नाही, असा प्रश्‍न संकपाळ यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे वेगाने हलली. आता तो 'बिग बॉस'च्या घरात राहणार, की बाहेर पडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News