नुसतं माणूस म्हणून जगुया...

वायरल
Saturday, 10 August 2019

जिकडं तिकडं माणसच
 माणसाला वाचवण्यासाठी धावपळ करत होती,
 जिकडं तिकडं माणसच माणसाच्या दुःखावर पांघरून घालत होती, 

मुंबई पुरात अडकली
 तेव्हा ना सिद्धिविनायक धावून आला
ना अल्लाचा कुणी बंदा धावून आला. 

नाशिक पुरात अडकलं
 तेव्हा ना वणीची देवी धावून आली
ना शिर्डीच्या साईबाबाने चमत्कार केला. 

कोल्हापूरची अवस्था बघता
ना महालक्ष्मी धावून आली
ना जोतिबा धावून आला.

पंढरपूरात पाणी शिरलं
 तेव्हा ना विठोबा धावून आला
ना गोपाळपुरचा श्रीकृष्ण

जिकडं तिकडं माणसच
 माणसाला वाचवण्यासाठी धावपळ करत होती,
 जिकडं तिकडं माणसच माणसाच्या दुःखावर पांघरून घालत होती, 
माणसंच माणसांसाठी हळहळताना दिसत होती. 

कित्येक निर्जीव झेंड्यांनी कधीच माना टाकल्या आहेत,
 सारेच धर्म वाहत वाहत समुद्राकडे चालले आहेत

जाउद्यात साले एकदाचे...

 आता पुन्हा इथं जाती धर्माच्या वस्त्या, रंगांची दुकानं अन देवांचे बाजार निर्माण व्हायला नकोत. 

निसर्गाने नुसतं
माणूस होऊन जगण्याची सूचना केलीये,
तिच्याकडे कानाडोळा करण्यात अर्थ नाही...

नुसतं माणूस म्हणून जगुया...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News