जुहू चौपाटी परिसरात 'समुद्र स्वछता अभियान'

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 January 2019
  • सिशेल लॉजिस्टिक्स आणि यिनबझचा संयुक्त उपक्रम

मुंबई : सिशेल लॉजिस्टिक्स आणि यिनबझ यांच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रूझ येथील जूहू चौपाटी परिसरात 'समुद्र स्वच्छता अभियान' कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला होता. यावेळी रामाडा हॉटेल जवळून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात सिशेल लॉजिस्टीकचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. याठिकाणी संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात कचरा जमा करून जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला.  

स्वछता अभियानासोबतच प्लास्टिक आणि इतर कचरा वापरण्याचे तोटे देखील नागरिकांना यावेळी  समजवून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सिशेल लॉजिस्टिक्स आणि यिनबझच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात तरूण या अभियानात सहभागी झाले होते.

मुंबईतील अनेक समुद्रकिनार्याना कचऱ्याने विळखा घातला आहे. त्यामुळे ते किनारे स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जे तरूण या उपक्रमामध्ये सहभागी होतील ते जग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतील हा सिशेल लॉजिस्टिक्स कंपनीचा हेतू आहे. तसेच हिरव्यागार आणि स्वच्छ वातावरणासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून अशाप्रकारे आणखी उपक्रम राबविण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News