मुख्यमंत्रिपदावरुन भाजपच्या अवधूत वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला जहरी टोला लगावला आहे. शिवसेनेने वर्धापन दिनानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात अनेक संकल्प करण्यात आले होते. याच अग्रलेखावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

अवधूत वाघ काय म्हणाले?

“कोण काय म्हणतं, कोण काय छापतं, याला काहीही महत्त्व देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील पाच वर्षांसाठी रिकामी नाही.” असे म्हणत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा नेता बसावा, ही शिवसेनेचं स्वप्न आहे. याआधी मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या रुपात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, आता मोठ्या संख्येत जागा निवडून आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, असा मानस अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करुन रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कुणाच्या जास्त जागा येतील, यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपद कुणाकडे द्यायचे हे ठरण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News