पत्रकाराने वाचविले युवकाचे प्राण; वडूथच्या कृष्णा नदीतून काढले बाहेर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

सातारा: शिवथर (ता. वडूथ) येथे मोलमजुरी करणारा ज्ञानेश्वर यशवंत सकटे (वय 35) आज सकाळी कृष्णा नदी पात्रालगतच्या शकुंतलेश्वर मंदिर येथे हातपाय धुण्यास गेले होते. या वेळी तो पाय घसरून नदीत आत वाहत गेला. त्याने अनेक गटांगळ्या खात झाडाच्या फांद्या घट्ट पकडून धरल्या. या वेळी वडूथ पुलावरून निघालेले "सकाळ'चे पत्रकार संतोष साबळे, अक्षय साबळे यांनी धाडस करून त्याचे प्राण वाचविले. 

पावसाचे प्रमाण वाढले असल्याने कृष्णा नदीने धोक्‍याची पातळी गाठली आहे. ज्ञानेश्‍वर हा शकुंतलेश्‍वर मंदिराजवळ हातपाय धुण्यासाठी उतरला होता. मात्र, पाय घसरून तो नदीपात्रात पडला. पोहता येत असले, तरी वेगवान प्रवाहामुळे त्याला नदीपात्रातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तो वडूथ येथील पुलाखालून वाहत निघाला. दरम्यान पाण्यात गटांगळ्या खाल्याने तो भयभीत झाला होता. त्यातच त्याच्या हाती झाडाच्या फांद्या लागल्याने त्याने त्या घट्ट पकडून ठेवल्या.

दरम्यान, वडूथ पुलावरून साताऱ्याकडे निघालेले पत्रकार संतोष साबळे यांनी ते पाहिल्यावर जिवाची पर्वा न करता थेट त्या युवकाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्यासोबत असणारा वडूथ येथील युवक अक्षय आणि संतोष यांनीही शेतकऱ्यांकडून दोऱ्या आणून ते नदीपात्रालगतच्या झाडावर चढले. वाहत असलेल्या युवकाच्या दिशेने फांदीवरून नदीपात्रात उतरून त्या युवकाच्या कमरेला हातातील दोर बांधला.

संतोष, अक्षयने धोकादायक स्थितीतील झाडाच्या फांदीवरून त्या युवकाला बाहेर काढले. या दरम्यान, एक फांदी कुजली असल्याने त्यावरून संतोष नदीपात्रात पडले. मात्र, प्रसंगावधान राखत नदीपात्रात लोंबकळणाऱ्या दुसऱ्या झाडाच्या फांद्या पकडून ते परत नदीपात्राबाहेर आले. यामुळे उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यादरम्यान गावातील युवक व पंचक्रोशीतील सेवाभावी संस्थेचे सदस्य, ग्रामस्तही मदतीस धावून आले. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News