औरंगाबादचे हे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे तंत्रकौशल्य वाढवणार

अतुल पाटील
Tuesday, 11 June 2019
  • प्रशिक्षणासाठी जेएनईसीचे सहा प्राध्यापक जर्मनीला रवाना झाले आहेत.
  • जेएनईसीच्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रकौशल्ये वाढीला लावण्यासाठी सेंटर ऑफ एक्‍सलन्स निर्माण केले आहे.
  • जेएनईसीच्या प्राध्यापकांचा चमू जर्मनीतील ऱ्हिने मॅस्यू येथे रवाना झाला आहे.

औरंगाबाद : सेंटर ऑफ एक्‍सलन्स अंतर्गत अत्याधुनिक यंत्रप्रणाली, उपकरणे जेएनईसीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहेत. त्याच्या प्रशिक्षणासाठी जेएनईसीचे सहा प्राध्यापक जर्मनीला रवाना झाले आहेत.  जेएनईसीच्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रकौशल्ये वाढीला लावण्यासाठी सेंटर ऑफ एक्‍सलन्स निर्माण केले आहे.

जर्मनीच्या क्रिस्टीयानी शार्पलाईन टेक्‍निकल ट्रेनिंग प्रा. लि. च्या सहकार्याने या सेंटर ऑफ एक्‍सलन्समध्ये मेकॅट्रॉनिक्‍स, रोबोटीक्‍स, इलेक्‍ट्रोन्युमॅटीक्‍स, कॅड, कॅम, सीएनसी, थ्री-डी प्रिंटर्स, ऑटोमेशनप्रणालीसारखे अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. जेएनईसीतर्फे पाच कोटीपेक्षा जास्त गुंतवणुक यात केली आहे. 

अत्याधुनिक उपकरणांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जेएनईसीच्या प्राध्यापकांचा चमू जर्मनीतील ऱ्हिने मॅस्यू येथे रवाना झाला आहे. 9 जून ते 27 जून दरम्यान, प्रशिक्षण होणार आहे. या चमुत विभागप्रमुख डॉ. एम. एस. कदम, सेंटर ऑफ एक्‍सलन्सचे प्रमुख डॉ. विनिता जोशी, समन्वयक प्रा. पंकज ढोबळे, प्रा. किरण जगताप, प्रा. विशाल लिपने, प्रा. वैभव उकरंडे यांचा समावेश आहे. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विश्वस्त प्रताप बोराडे, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्या डॉ. विजया मुसांडे यांची उपस्थिती होती 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News