जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गड किल्ले स्वच्छता मोहीम संपन्न

दिव्येश जाधव, खर्डी
Thursday, 3 October 2019

खर्डी - जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खर्डीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहापुर तालुक्यातील माहुली किल्ला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गड किल्ले स्वच्छता अभियान तसेच ऐतिहासिक वास्तूचा ठेवा जतन ठेवावा यासंदर्भात जागृती निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.  महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मा. के. आर. कळकटे सर यांनी या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले तर संस्थेचे अध्यक्ष व या उपक्रमाचे प्रेरणास्थान मा. रविंद्र घोडविंदे यांची भूमिका उपयुक्त होती.

महाराष्ट्रातील गड, किल्ले यांचे संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भात तरुणांमध्ये जनजागृती तसेच प्लास्टिक मुक्त अभियान यामध्ये तरुणांची मोलाची भूमिका आहे याची माहितीही या अभियानाच्या उद्बोधनामध्ये दिली. प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्लास्टिकचा वापरू नये तसेच इतरांनाही त्यासंदर्भात जागृत करावे असे आवाहन या मोहिमेत केले गेले.

विद्यार्थ्यांनी किल्ले परिसरातील काही टाकाऊ वस्तू एकत्रित गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 94 विध्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रा. एस. व्ही. देशमुख यांच्यासह प्रा. विशे सर, घोरपडे सर, धसाडे सर, प्रा. पाटील मॅडम, सासे मॅडम, बांगर मॅडम यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम संपन्न केला. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News