हाच तो खेकडा ज्यानं तिवरे धरण फोडलं! अटक करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हाच तो खेकडा ज्यानं तिवरे धरण फोडलं, असं म्हणत ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हाच तो खेकडा ज्यानं तिवरे धरण फोडलं, असं म्हणत ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

हाच तो खेकडा ज्याने तिवरे धरण फोडलं, २३ माणसं मारली, धन्य आहे. स्थानिक आमदाराचा भाऊ कॉन्ट्रॅक्टर, का नाही अटक? कोण जबाबदार??? खेकड्याला तरी अटक करा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, आपला कुठं कोण मेला तर आपण सुतक पाळायचं. कुठे गेला माझा संवेदनशील महाराष्ट्र, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट-<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News