पुन्हा एकत्र येणार जिमी आणि माही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

अभिनेता जिमी शेरगिल आणि अभिनेत्री माही गिल ‘साहेब, बीवी और गॅंगस्टर’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्यांच्या ॲक्‍शन अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत.

अभिनेता जिमी शेरगिल आणि अभिनेत्री माही गिल ‘साहेब, बीवी और गॅंगस्टर’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्यांच्या ॲक्‍शन अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत.

‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’ या चित्रपटात हे दोघेही एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात जिमी आणि माहीची वेगळी केमिस्ट्री दिसून येईल. तसेच माही-जिमसोबत अभिनेता सौरभ शुक्‍ला, पवन मल्होत्रा, मुकेश तिवारी, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, प्रणती प्रकाश रायसारखे कलाकारही झळकणार आहे.

दिग्दर्शक मनोज झा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांच्याबरोबरच लवली वर्ल्ड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News