जिम सांगणार पर्यावरणाचं महत्त्व

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 February 2019

‘संजू’, ‘नीरजा’, ‘पद्मावत’ यांसारख्या हिंदी चित्रपटात अभिनेता जिम सर्भ महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.

जिमच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं. आता तो त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. डिस्कवरी वाहिनीवरी ‘प्लॅनेट हिलर्स’ या मालिकेचं जिम सूत्रसंचालन करणार आहे.

अनियोजित शहरीकरण, इलेक्‍ट्रॉनिक कचरा व्यवस्थापन, वायुप्रदूषण या सगळ्या पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे थांबवण्यात येतील, हे या मालिकेमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिम म्हणतो, ‘मी मनुष्य, प्राणी आणि प्रकृती यामध्ये कधीच भेदभाव करत नाही. पर्यावरणाचाच एक भाग म्हणून या मालिकेचे सूत्रसंचालन करण्यास मी फार उत्सुक आहे.’ एकूणच काय; तर या मालिकेच्या निमित्ताने जिम पर्यावरणाचं महत्त्व प्रेक्षकांना पटवून सांगणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News