गरजू विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीटची तयारी करून घेणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • परीक्षा परिषद, पुणे आणि दक्षणा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे.

औरंगाबाद  - परीक्षा परिषद, पुणे आणि दक्षणा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. बारावीनंतर विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी हुशार असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. याकरिता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दक्षणा फाउंडेशनतर्फे परीक्षेद्वारे निवड केली जाईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर निवासी मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थी मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्यास त्या-त्या विभागीय शिक्षण मंडळाच्या कक्षेत केंद्राची निवड करून चाचणी परीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी www.school.maharashtra.gov.in संकेतस्थळावर पाहता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News