पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंची रामराजेंवर टिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रतिउत्तर
  • जयकुमार गोरेंची रामराजेंवर टिका

सातारा - रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं. 

“आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्याला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही”, अशी घणाघाती टीका करत जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे.याशिवाय जयकुमार गोरे यांनी रामराजेंना सन्मानाने वयाचा विचार करून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला.

नेमकं काय म्हणाले होते रामराजे निंबाळकर?

“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News