जयंत पाटील म्हणाले, भाजपचे काही नेते संपर्कात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 September 2019
  • आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. तसेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. 

नागपूर : आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपातील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. तसेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. 

योग्य वेळी त्यांची नावे घोषित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करून आपली ताकद दाखविणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे, असे ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News