स्वतःचा चेहरा आरश्यात पाहिला आणि मुलाला हिरो बनवण्याची शपथ घेतली 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

ही १९५७ ची एक गोष्ट आहे. जेंव्हा १४ वर्षाचा वीरू देवगण बॉलीवूड मध्ये जाण्यासाठी अमृतसर येथील आपल्या घरातून पळून गेला होता. मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने मित्रांसोबत विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले. यामुळे त्यांना मित्रांसोबत सात दिवस तुरुंगात जावे लागले.

ही १९५७ ची एक गोष्ट आहे. जेंव्हा १४ वर्षाचा वीरू देवगण बॉलीवूड मध्ये जाण्यासाठी अमृतसर येथील आपल्या घरातून पळून गेला होता. मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने मित्रांसोबत विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले. यामुळे त्यांना मित्रांसोबत सात दिवस तुरुंगात जावे लागले.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मुंबई शहरात पोटाच्या भुकेमुळे जगणे मुश्किल होऊ लागले. सोबत आलेल्या मित्रांना हे सहन झाले नाही ते अमृतसरला परत निघून गेले.पण वीरू देवगण परत गेले नाहीत. मुंबईमध्ये टॅक्सी साफ किंवा कारपेंटरचे काम करू लागले. काम करत असताना फिल्म स्टुडिओचे चक्कर मारत असत. त्यांना हिरो बनायचे होते. परंतु त्यांना ही गोष्ट लवकर लक्षात आली की, हिंदी चित्रपटात सर्व चॉकलेट हिरो चालतात. त्यांच्या समोर आपल्याला संधीच मिळणार नाही.

वीरू यांनी स्वतः सांगितले-

”जेंव्हा मी आरश्यासमोर स्वतःचा चेहरा पाहिला तर एखाद्या स्ट्रगलर्स पेक्षा स्वतःला खूप कमी असल्याचे वाटले. म्हणून मी हिरो बनण्याचे स्वप्न पाहणे बंद केले, पण मी शपथ घेतली की मुलाला हिरो बनवेल.”

वीरू देवगण यांनी आपल्या मुलाला म्हणजेच अजय देवगनला हिरो बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. अजयला कमी वयापासूनच फिल्ममेकिंग, ऍक्शनच्या जवळ ठेवले. हे सर्व कामं अजयला करायला लावत. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर डान्स क्लासेस, घरामध्ये जीम, उर्दूची क्लास, हॉर्स रायडींग असे खूप काही करायला लावले. त्यासोबतच त्यांच्याच चित्रपटातील एक्शन टीमचे सदस्य बनविले. त्यांनी सेटचे वातावरण कसे असते ते शिकविणे सुरू केले. यामुळे अजय चित्रपट क्षेत्रात खूप सक्षम झाला.

अजयचे त्यावेळी कॉलेजमध्ये शिक्षण चालू होते. पार्ट टाइम वेळेत शेखर कपूर यांच्या ‘दुश्मनी’ चित्रपटात सहाय्यक म्हणून काम करत होता. तो पर्यंत अजय चित्रपटात काम करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता. एके दिवशी अजय सायंकाळी आपल्या घरी आल्यावर दिग्दर्शक संदेश/कूकू कोहली आणि वडील वीरू देवगण एकत्र बसले होते. त्यावेळी वीरू अजयला म्हणाले संदेश ‘फूल और कांटे’ नावाचा चित्रपट बनवत आणि तू या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करावं अशी त्यांची इच्छा आहे.

यावर अजय याची प्रतिक्रिया होती की, तुम्ही पागल झालात काय? ”आता तर मी १८ वर्षाचा आहे आणि माझी लाईफ एन्जॉय करतोय” अजयने या चित्रपटात काम करण्यास नकार देऊन निघून गेला. ही गोष्ट ऑक्टोबर १९९० ची होती. आणि पुढच्याच महिन्यात नोव्हेंबर मध्ये अजय त्या चित्रपटाची शूटिंग करत होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News