महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त अकोल्यात जनजागरण

सकाळ (यिनबझ)
Monday, 29 July 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने २ आॅगस्ट ते २ आॅक्टोंबर पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आवाहन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले आहे. 

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने २ आॅगस्ट ते २ आॅक्टोंबर पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आवाहन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले आहे.                           

अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाची मासिक सभा गांधी जवाहर बागेत संपन्न झाली. या सभेत गांधी १५० जयंत्युत्सव कार्यक्रम नियोजन, चरखा संमेलनाचे आयोजन, साम्ययोग चे वाचक वाढविणे, गांधी विचाराची युवा पिढी संघटीत करणे, वस्रस्वावलंबन,खादी ग्रामोद्योग,निसर्गोपचाराचा प्रचार या दरम्यान करण्याचे ठरले.

ज्येष्ठ सर्वोदयी अॅड. रामसिंह राजपुत, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, वस्र स्वावलंबन अभियान प्रमुख वसंतराव केदार, तेल्हारा तालुका संयोजक सुरेशचंद्र काळे, कापुस ते कापड प्रकल्प प्रमुख प्रल्हादराव नेमाडे, कोषाध्यक्ष महेष आढे, व्यसनमुक्ती प्रचारक अंबादास वसु, खादी वस्र प्रमुख आत्माराम शेळके, युवा समन्वयक आकाश इंगळे, सर्वोदय साहित्य प्रचारक रोहीत कृष्णकांत तारकस, लाल बहादुर शास्री विद्यालय बपोरीचे पवार सर यांनी या सभेत सहभाग घेतला. सभेचे संचालन डाॅ.मिलींद निवाणे यांनी तर आभारप्रदर्शन महेश आढे यांनी केले.राष्ट्रवंदनेने सभेची सांगता झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News