जान्हवी-ईशान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

१४ वर्षांनंतर ‘बंटी और बबली’ या चित्रपटाचा सिक्वेल पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ हा चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. १४ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे शीर्षक ‘बंटी और बबली अगेन’ असणार आहे. या सिक्वेलमध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची भूमिका ‘धडक’ स्टार्स अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता ईशान खट्टर साकारणार असल्याची चर्चा आहेत. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण शर्मा करणार आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News