जनता जनार्दनच लोकशाहीचे महानायक..!!

जनार्दन धनगे
Thursday, 31 October 2019

गांधी नेहरू, आंबेडकर या तिघांचाही भरवसा सामान्य माणसांवर होता, हाच तो सामान्य माणूस जो कितीही मॅनेजमेंट झालं, निवडणुका अनेक माध्यमं हाताशी घेऊन लढविल्या गेल्या तरी स्वतःची एक वेगळी प्रकाश वाट शोधेल, ही खात्री गांधींना होती. नेहरूंना तर प्रत्येक माणूस भारतमाता वाटत असे. नेते एक वेळ रस्ता चुकतील पण या देशातील माणूसच राजकीय प्रक्रियेला खरी दिशा देईल ही बाबासाहेबांची धारणा होती.

गांधी नेहरू, आंबेडकर या तिघांचाही भरवसा सामान्य माणसांवर होता, हाच तो सामान्य माणूस जो कितीही मॅनेजमेंट झालं, निवडणुका अनेक माध्यमं हाताशी घेऊन लढविल्या गेल्या तरी स्वतःची एक वेगळी प्रकाश वाट शोधेल, ही खात्री गांधींना होती. नेहरूंना तर प्रत्येक माणूस भारतमाता वाटत असे. नेते एक वेळ रस्ता चुकतील पण या देशातील माणूसच राजकीय प्रक्रियेला खरी दिशा देईल ही बाबासाहेबांची धारणा होती.

या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी आपला निकाल खरं तर लोकशाहीच्या बाजूने दिलाय असं मला वाटत, जातीपातीचे राजकारण, कलम ३७० सारख्या भावनिक मुद्यांवर वारंवार निवडणूक प्रचार करणे या पेक्षा लोकांनी जीवन मरणाच्या, जीवनाच्या रोजच्या रणांगणातील मुद्यांना महत्व दिल्याचे दिसून येते. खरं तर हा राजकीय संस्कृतीतील मोठा बदल वाटतो. खरं तर मतदारच नायक असतो अन तोच तर न्यायाधीश असतो, आणि आज आपण हे सिद्ध केलं. लोकशाही मध्ये सत्ताधाऱ्यांना जितकं महत्व असत तितकंच विरोधी पक्षालाही असत. आम्हाला विरोधकच उरले नाही असा अविर्भाव सत्ताधारी पक्षाला महागात पडला असेच म्हणावे लागेल. दिल्लीच्या नेत्यांना गल्लीत आणून केवळ भावणीकतेच्या बळावर तुम्हाला निवडनुका लढविता येणार नाही. येथील मतदार हा संविधानीक विचारांवर चालणारा खरा पाईक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, तो पुरोगामी महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सांगत भविष्याशी नाते जोडणारा आहे. 

त्यामुळे सर्वानाच यापुढे लोकांच्या स्थानिक मुद्यांवर काम करावं लागेल. खरं तर जमिनीवरचे प्रश्न तुम्ही माध्यमांच्या स्क्रीनवरून गायब करू शकतात, तसा प्रयत्न हि अलीकडच्या काळात झाला पण तो सतत यशस्वी होत नाही. कितीही माध्यम काबीज (मॅनेज) केली तरी तुम्हाला मूळ मुद्यांवरून दूर जाता येणार नाही, हेही आता स्पष्ठ झालंय. एकूणच मतदारांना गृहीत धरून तुमचा अरेरावी कारभार आता चालणार नाही. कारण लोकशाहीत शेवटी प्रजा हीच राजा आहे, हेच अंतिमतः सत्य आहे. मुळामध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा जाणीवपूर्वक उपस्थित करून स्थानिक प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न झाला. पण स्थानिक प्रश्नांनी त्यावर मात केली हेच खरं. यामुळेच मी वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही मतदारांना गृहीत धरता कामा नये. खरं तर सत्ता डोक्यात गेल्यावर माणसाला विरोधकच नको. आता हा इतिहास आहे, तो सत्तेच्या हवेत असतो, आणि अहंकाराचा धोंडा पायावर पाडून घेतो, सत्ताधारी पक्ष्याच्या बाबतीत दुसरे काय झाले, लहान भावाच्या भिमिकेत असलेल्या शिवसेनेच्या मातोश्री वर दिवाळीच्या वेगवेगळ्या ऑफर येण भाजपसाठी मोठी डोकेदुखीच आहे. आता केवळ मार्केटिंग व मनी मॅनेजमेंट करून तुम्हाला निवडणूका जिंकता येणार नाही. हे या जनादेशाने पुन्हा अधोरेखित झालाय. मुंबई, पुणे, ठाणे या बड्या शहरांनी जर महायुतीला तारले नसते तर आजचे चित्र काही वेगळे असते. एकूणच तुम्ही कुठल्याही पक्ष्याचे असाल राष्ट्रवादासारख्या संवेदनशील मुद्यांला तुम्ही अजेंडा ठेऊ शकत नाही, स्थानिक मुद्यांवर लादू शकत नाही, हेही यानिमीत्ताने उघड आहे. 

त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करणारा नेता आम्हाला हवाय, हे सांगणारा जनादेश ३७० तोफांची सलामी देणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्राने या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक डाव धुळीस मिळविल्याचे दिसते. हि निवडणूक थेट देशाची जोडायची व आपली वाट सोपी नव्हे, ती एकहातीच करायची असा एककलमी कार्यक्रम होता का? भविष्यात अगदी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादाचे मुद्दे उपस्थित करून निवडणूक लढवायला कुणीही मागे पुढं पाहिलं नसत, याने स्थानिक व महत्वाचे मुद्दे माघे पडले असते. भाजपने मोठ्या प्रमाणात आयारामानां संधी देताना त्यांच्या आयडोलॉजीचा विचार तरी कुठे केल्याचे निदर्शनात नाही. याला इतर काही पक्षही अपवाद नाहीच. जगण्याच्या संबंधित मुद्दा होता कुठं इथे. पण विशेष म्हणजे माध्यमांना सोबत घेऊन विशिष्ट लोकांना सोबत घेऊन, समाज माध्यमांचा हवा तसा वापर करून हे सर्व चालू शकते असा भ्रम पुढे भ्रमनिराशामध्ये रूपांतरित झाला. खरं तर माघिल काळात निवडणुका सामान्यांच्या हातून निसटून त्या उद्दोजकांच्या, इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपन्यांनी हाताशी घेतल्या होत्या असे चित्र निर्माण झाले होते आता पुढे काय होणार? असाच प्रश्न होता. 

पण या निकालाने राज्यांतील सर्वसामान्य मतदारांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सभेला काळे कपडे घालून जाणाऱ्यांना तुम्ही देशद्रोही करून टाकतात, कांद्याच्या प्रश्नावर आम्ही बोलायला गेलो तर प्रचार सभेला हे महाशय युद्धभूमी करून टाकतात, मग व्यक्तिस्वातंत्र उरते कुठे? त्यामुळे हे बदलेल चित्र खूपच आशादायक वाटत. पक्ष कुठलाही असो, उन्माद करायचा नाही, सत्ता म्हणजे जनसेवा, काम करेल तोच टिकेल नाहीतर घरी जावे लागेल हेच जनतेने सर्वाना दाखवुन दिलय. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हरियानातीलही सामान्य माणसाला आपला आतला आवाज सापडला, व तेथेही येणाऱ्या काळात भक्कम विरोधी पक्ष उदयास येईल. इकडे सातारा येथे उदयनराजे भोसले याना आयाराम गयाराम भूमिकेला अमान्य करून लोकशाहीत प्रजा हीच सर्वश्रेष्ठ राजा हेच दाखवून दिले. जणू भारताच्या राज्यघटनेचा आशयच आज अधोरेखित झाला आहे, येणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या सर्व पदाधिकऱ्यानां शुभेच्छा, विरोधी पक्ष्याला त्याहून अधिक शुभेच्छा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News