जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Saturday, 10 August 2019

काश्मीर खोऱ्यात अद्याप सर्वत्र हाय अ‍ॅलर्ट असून, लोकांच्या वर्दळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. उधमपूर व सांबा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालये शुक्रवारी सुरू झाली.

श्रीनगर : जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. तसेच  काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे.

काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा शुक्रवारी (9 ऑगस्ट) काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आणि नमाजासाठी काही काळ लोकांना बाहेर पडण्याचीही सूट देण्यात आली होती. आजपासून शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आल्या आहेत. बकरी ईदमुळे काश्मीरमधील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र लोकांना वस्तीच्या जवळपास तसेच बाजारात जाण्याचीच परवानगी आहे. बाजार व दुकानेही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे.

 

काश्मीर खोऱ्यात अद्याप सर्वत्र हाय अ‍ॅलर्ट असून, लोकांच्या वर्दळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. उधमपूर व सांबा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालये शुक्रवारी सुरू झाली. जम्मूतील शाळा सुरू झाल्या असल्या तरी काश्मीर खोऱ्यातील शाळा कधी सुरू होणार, हे स्पष्ट झालेले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News