जम्मू-काश्मीरमधील नेते नजरकैदेत; कलम १४४ लागू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019

जम्मू काश्मीर : गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या अंतर्गतच श्रीनगरमधील माजी तीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आज सोमवारपासून जम्मूमध्ये सकाळी सहा वाजल्यापासूनच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुढील काही आदेश येईपर्यंत हे कलम लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  या कालावधीत ४ हून अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही, असे जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. जम्मूत मोबाइल, इंटरनेट बंद करण्यात आले आहे. 

काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. श्रीनगरप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही १४४ कलम लागू करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे. तसंच, जम्मूमध्येही सोमवारपासून सरकारी आणि खासगी शिक्षण संस्था बंद राहणार आहेत. असं असलं तरी संचारबंदी मात्र लागू करण्यात आली नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीर सरकारने केला आहे. 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अबुदल्ला यांनी रात्री उशिरा टि्वट करत नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगितले. 'हे काय सुरु आहे. आमच्यासारख्या शांततेसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज कसा दाबला जात आहे, हे जग पाहत आहे,' असे मुफ्तींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News